आठवणीचा कट्टा... 😊
तुमच्या आमच्या सर्वांच्या जवळचा.. अगदी कुठेही गेलो तरी त्या जागेवर आपण नक्की रमलेलो असतो. नकळतपणे अगदी घट्ट नात जुळत..लहानपणापासून वयोवृद्धापर्यंत सगळ्याचा जवळचा असलेला कट्टा.... मग कट्टा कोणत्याही असो कॉलेजचा असो किंवा गल्लीचा कट्टा असो.. कट्टा हा म्हणजे तरूणाईचा जीव की प्राण.. या कट्ट्यावर काय घडत ?काय घडत नाही ? ..जमलेली बिघडलेली गुपित करण्यापासून आर्थिक मंदी, महागाई, थोडक्यात काय अख्या जगाची बसल्या जागी सफर इकडे घडते ती याच कट्ट्यावर.. तास तास कट्ट्यावर रेंगाळणार्यांची संख्या काही कमी नसते. मजा मस्ती चर्चा, राग रुसवे फुगवे, प्रेमळ गप्पा अशा सगळ्या गोष्टी कट्ट्यावर पहायला मिळतात. लेक्चंर बंक केल्यानंतर विद्यार्थी सापडण्याची हमखास जागा म्हणजे कट्टा.. एखाद्या रंगाची गंधाची फूल सजवून ठेवावी तशी मुलांच्या गप्पाची मैफल कट्ट्यावर जमवून बसलेली असतात. कॉलेजातले वेगवेगळे नमुने या कट्ट्यावर हमखास पहायला मिळतातच. रँगिंगवर बंदी असली तरी विद्यार्थांना वेलकम करत त्याची चेष्टामस्करी प्रत्येक कट्ट्यावरच होतेच. मजामस्ती, गप्पाटप्पा, ही कट्ट्यावरची खासियत असली तरी या कट्ट्यावर काही चांगल्या गोष्टी ...