अतुट नात ते..........

अतूट नात ते, सुंदर प्रेमाच नात ते, कधीही हक्काने ओळख करून देणारे नात ते,, अहो अस नात तरी कोणत असाव भाऊ बहीण ते... भावाच निरागस प्रेम अणि बहिणीची माया हे सर्वाच्या भाग्यदायी नसत . नाजुकशी, फुलसुंदर , भोळी भाबडी, हक्काने अरे दादा हाक मारणारी बहीण ..ही माझी लाडकी बहीण अशी ओळख करून देणारा भाऊ प्रत्येकाचाच नशिबात असतो असे नाही. बहिणीच्या सदैव पाठिशी खंबीरपणे उभा राहणारा, अडचणीत नेहमी सगळ्याच्या आधी मदतीसाठी पुढे असणारा, दुसर्या कोणी बहिणीला छेडले तर “माझ्या बहिणीकडे वाकड्या नजरेने बघायच नाही ”अशी धमकी देणारा,,वडीलांच्या नंतर घरासाठी एक पुरुष म्हणून सोबत असणारा.. म्हणजे भाऊ ... म्हणतात ना वडीलानंतर घरातला जबाबदार पुरूष म्हणजे मुलगा... पण आता बहीण आणि भावाच्या नात्यातील वागणूकीबदल बोलायच झाल तर तो त्या त्या कुटूंबाच्या विचार करण्यावर आहे. आताच्या काळात मुलगा ऩमुलगी असा फरक फारसा दिसून येत नाही पण कुटूंबाच्या विचारांवर मात्र काहीसा फरक दिसून येतो. मुलगा म्हणजे घरचा दिवा किंवा घरचा खरा वारस अशी समज असणाऱ्या कुटुंब...