मी मराठी भाषा बोलतेय.....!
“मी मराठी भाषा बोलतेय! अवघ्या महाराष्ट्राची मायबोली. देववाणी -संस्कृत भाषा ही माझी महामाय. संस्कृतातून प्राकृत निर्माण झाली आणि प्राकृतातून मी अवतरले. पण हे परिवर्तन काही आजचे नाही. त्याचप्रमाणे ते एका दिवसात झालेले नाही. वर्षानुवर्षे हे परिवर्तन चालू होते. सामान्य जनांच्या बोलीतून मी जन्माला आले... मला फार मोठी परंपरा लाभलेली आहे. माझा भांडार सम्रूद्ध झाले. आज सातशे वर्षेात मला माझ्या सारस्वतांनी खूप घडवले त्यात कधीही खंड पडली नाही. माझ्या शुद्धतेविषयी सांगायचे झाले तर अगदी शिवाजी राजांनीही स्वराज्य स्थापनेनंतर पहिले काम काय केले असतील तर माझे शुद्धीकरण करून माझा शब्दकोश तयार करवून घेतला.. माझे मूळ ज्या गीर्वाण-वाणीत आहे तिचा खजिना तर माझ्यासाठी खुला असतो. १९६० साली माझे स्वतंत्र राज्य झाले.. मी राज्यभाषा झाले.... पण आता आजकाल अनेकदा माझ्या भविष्याबद्दलची चिंता व्यक्त केली जाते.. मराठी भाषेचे भवितव्य काय? कारण मोठ मोठ्या शहरांमध्ये मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडत आहेत. बहुसंख्य महाराष्ट्रीय मंडळी आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतात.. का?? तर इंग्रजी भाषेवर प्रभुत...