Posts

Showing posts from June, 2019

पहिल्या पावसाची रिमझिम....

Image
पाऊस...... पाऊस या शब्दातचं खरतर थंडावा आहे.  जास्ती जास्त जणांचा आवडता ऋतू म्हणजे पावसाळा... दरवर्षी जेव्हा पाऊस येतो तेव्हा त्याच्या पहिल्या सरीत हव्याश्या गारठ्यात खुप जुन्या आठवणी तो जाग करतो. धावपळीच्या जगात आयुष्य कसं यंत्र बनलेलं असतं. रोजचं आयुष्य हे घड्याळाच्या काट्यांप्रमाणे फिरतचं असत.  रोज सकाळी उठा, नाश्ता करा, उन्हाचे चटके खात कधी एकदा ऑफीसच्या ए. सीत जाऊन बसतोय असं होतं.  उकाड्याने हैराण  झालेल्या प्रत्येकाच्या मनात पाऊस कधी पडतोय? हाच प्रश्न सारखा सतावतो.   अचानक चटके देणाऱ्या रखरखत्या उन्हात आभाळ भरतं, वारा भणाणतो , थंडगार वाऱ्याच्या झुळूकाने अंग शहारतं आणि  दिवसभराचा तो आळस कुठल्या कुठे गायब होतो,  आणि उन्हामुळे त्रासलेला प्रत्येकजण निश्वास सोडतो.      पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद सगळेजण घेतात.  पावसाच्या त्या पहिल्या सरीत भिजताना शाळेतील -कॉलेजातील दिवसांमध्ये आपण  पुन्हा खेचले जातो आणि जुन्या आठवणी पुन्हा नव्याने ताज्या होतात.           पाऊस म्हटलं की,  ...