कविता कॅफे

कविता....! काय असते कविता? कविता कशी करतात माहित नाही? नक्की कवितेमध्ये काय मांडायच माहित नाही? पण एखादी कविता वाचताना किंवा ऐकल्यावर एक अनोखा आंनद मिळतो जणू काही ती कविता आपल्यावरच लिहिली आहे अस वाटत... म्हणजे मला तरी असच वाटत.. एखाद्या कवीची कविता वाचल्यावर अरे ही कविता आपण पण करू असा सहज विचार डोक्यात येतो.. कविता म्हणजे आपल्या अंर्तमनात अनेक गोष्टींची,घटनांची व त्यांचा आपण लावलेल्या अर्थाची नोंद असावी. बहुदा कविता तेथूनच जन्माला येत असावी. आपण काय पाहतो? आपण कसे जगतो ? यांचा साधारण परिपाक असावा असे मला वाटते. रात्र आणि कविता याचा घनिष्ट संबंध असावा कारण रात्रीचा एकांतात कविता अजुन छान सुचते अस म्हणतात. कविता जी एकांतात बसून सुचते कविता जी समुद्राच्या किनाऱ्यावर बसून सुचते कविता जी किनार्याला मिठी मारणाऱ्या लाटांना बघून सुचते कविता जी हिरव्यागार झाडांना बघून सुचते कविता जी उंच डोंगर रांगांकडे बघून सुचते कविता जी पावसाच्या सरीत भिजताना सुचते कविता जी पांढर्या शुभ्र कोसळणार्या धबधबाकडे बघून सुचते कविता जी उगवत्या सूर्याला बघून सुचते कविता जी निळ्याशार शांत पाण्याकडे ब...