कविता कॅफे

कविता....! काय असते कविता? कविता कशी करतात माहित नाही? नक्की कवितेमध्ये काय मांडायच माहित नाही? पण एखादी कविता वाचताना किंवा ऐकल्यावर एक अनोखा आंनद मिळतो जणू काही ती कविता आपल्यावरच लिहिली आहे अस वाटत... म्हणजे मला तरी असच वाटत.. एखाद्या कवीची कविता वाचल्यावर अरे ही कविता आपण पण करू असा सहज विचार डोक्यात येतो..
कविता म्हणजे आपल्या अंर्तमनात अनेक गोष्टींची,घटनांची व त्यांचा आपण लावलेल्या अर्थाची नोंद असावी. बहुदा कविता तेथूनच जन्माला येत असावी. आपण काय पाहतो? आपण कसे जगतो ? यांचा साधारण परिपाक असावा असे मला वाटते. रात्र आणि कविता याचा घनिष्ट संबंध असावा कारण रात्रीचा एकांतात कविता अजुन छान सुचते अस म्हणतात.


कविता जी एकांतात बसून सुचते
कविता जी समुद्राच्या किनाऱ्यावर बसून सुचते
कविता जी किनार्‍याला मिठी मारणाऱ्या लाटांना बघून सुचते
कविता जी हिरव्यागार झाडांना बघून सुचते
कविता जी उंच डोंगर रांगांकडे बघून सुचते
कविता जी पावसाच्या सरीत भिजताना सुचते
कविता जी पांढर्‍या शुभ्र कोसळणार्‍या धबधबाकडे बघून सुचते
कविता जी उगवत्या सूर्याला बघून सुचते
कविता जी निळ्याशार शांत पाण्याकडे बघून सुचते
कविता जी पाटवाटांकडे बघून सुचते
कविता जी रंगीबेरंगी फुलांकडे बघून सुचते
कविता जी फुलांवर नाचणार्‍या फुलपाखरांकडे बघून सुचते
कविता जी स्वतःशी बडबड करणार्‍या पक्षांकडे बघून सुचते
कविता जी कॉलेज कट्ट्यावर बसून सुचते
कविता जी मायेच्या काळजीपोटी सुचते
कविता आपण सुचवू तशी सुचणारी असावी, कवितेची वेळी,अवेळी भरती येत असावी. 


मनातल्या कल्पनेची ती एक कळी असते. एक शब्द, एक मस्त, निखळ, मुक्त, आनंद! तर कधी राग, क्रोध, अन्यायाची चीड, संताप, भेदभावांची खदखद! या सार्‍या अशब्दा “कळींना” कवी कवितेच रूप देऊन “कळीला” फुलवतो ..त्या अशब्दांना अक्षरांच कोंदण कवी करतो आणि अक्षर कागदावर अवतरतो.. कवितेला नुसती अट्टाहासाने यमकांच्या बंधनात बंदी करण्याचा प्रयत्न करू नये. ज्या प्रवाहीपणे ती मनात घालमेल करते त्याच प्रवाहीपणे तिला पसरू द्यावे
म्हणून कवीप्रेमींसाठी, अंतम्रुख करण्यासाठी, त्यांचा मनातल्या गोष्टींचे कवितेत रूपांतर करून अनेक कवींच्या कवीतांची मेजवानी घेऊन येत आहे “कविता कॅफे ”....

हर्षाली प्रभाकर सावंत. 


Marathi#Marathikavita#Kavita#Kaviprem#Kavitalines#Cafe#KavitaCafe

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मी मराठी भाषा बोलतेय.....!

शब्द नसते तर....

थिएटर मधून बाहेर पडताना मी देखील...