जागतिक रंगभूमी दिन.

२७ मार्च...! २७ मार्च हा दिवस दरवर्षी जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा करतात. रंगभूमी म्हणजे नाटक आणि नाटक म्हणजे फक्त वेगवेगळी पात्र त्या पात्रातून सादर केलेले नाटक असा समज असतो. १९६१ मध्ये “युनेस्को” च्या इंटरनॅशनल इस्टिट्यूने या दिवसाची सुरुवात केली. पहिला जागतिक रंगभूमी दिन १९६२ मध्ये झाला. विष्णूदास भावे यांच्या “सीता स्वयंर” या नाटकाने मराठी रंगभूमीची सुरूवात झाली. त्यानंतर मराठी रंगभूमीने वेगवेगळी वळणे घेतली. त्यातील एक महत्वाचे वळण म्हणजे संगीत रंगभूमी. मराठी रंगभूमीवर सादर झालेली संगीत नाटके मराठी रंगभूमीचा एक वेगळाच सुवर्णकाळ होता. नाटक हे मराठी माणसाचे पहिले वेड असे म्हणण्यात काही हरकत नाही. चार मराठी माणसे एकत्र आली तर एखादे नाटक सादर झालेच पाहिजे. पोवाडा, भारूड, कीर्तन, दशावतार खेळ ही मुख्य मनोरंजनाचा भाग झाली. “नाटक” या कला प्रकाराला मराठी रसिक प्रेक्षकांनी भरभक्कम पाठबळ दिले आणि रंगभूमी बहरली. संगीत नाटकांनी परंपरा मागे पडल्यानंतर सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक, कौटुंबिक, विनोदी, रहस्यमय अशा नाटकांनीही काही काळ गाजविला. नाटक ...