ट्रेंड वेबसिरीजचा....

ब्लॉग्स ,फेसबुक ,ट्विटर, युट्युब ,इंस्टाग्राम आता हे नवीन विश्व म्हणजे सोशल मीडियाचं व्हर्च्युअल विश्व आहे . सोशल मीडिया म्हणजे आता सगळ्याच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग आहे असं म्हणायला काही हरकत नाही. युट्युब आणि त्यावरील विविध वेबसिरीज यावर तरुणाईचा कल जास्त आहे. वेबसिरीजचा आजची तरुणपिढी अधिक पटीने वापर करताना दिसत आहे. चित्रपट आणि मालिकांचे वेड हे सगळ्या जगात सारखेचं आहे. त्यात नाव कमवावं आणि मोठं कलाकार व्हावं म्हणून कित्येक कलाकार मुंबई गाठतात. छोट्या पडद्यावर झळकण्याचा त्यांच्या अपेक्षा असतात. मोठ- मोठ्या साहित्य लेखनानंतर ती गोष्ट दाखवा ,ती पटली तर निर्मितीच्या प्रक्रियेला सुरवात करा. अशा लांबलचक प्रक्रियेतून न जाता आपल्याला जे विषय आवडतात ते विषय तरुणांनी वेबसीरिजच्या माध्यमातून मांडायला सुरवात केलीय. तरुणाईला आकर्षित करण्यासाठी ऑनलाईन व्यासपीठावर वेबसिरीज हे हॉट आणि हिट माध्यम समजले जाते. चित्रपट , मालिका आपण बघतच असतो. पण मालिकांप्रमाणे सासु सुनेचं कंटाळवाणे रडगाणे हे वेबसिरीज मध्ये नसते. छोट्या आणि नेमक्या मांडणीतून कधी स...