ट्रेंड वेबसिरीजचा....

ब्लॉग्स ,फेसबुक ,ट्विटर, युट्युब ,इंस्टाग्राम आता हे नवीन विश्व म्हणजे सोशल मीडियाचं  व्हर्च्युअल विश्व आहे . सोशल मीडिया म्हणजे आता सगळ्याच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग आहे असं म्हणायला काही हरकत नाही. युट्युब आणि त्यावरील विविध वेबसिरीज यावर तरुणाईचा कल जास्त आहे. वेबसिरीजचा आजची तरुणपिढी अधिक पटीने वापर करताना दिसत आहे. चित्रपट आणि मालिकांचे वेड हे सगळ्या जगात सारखेचं  आहे. त्यात नाव कमवावं आणि मोठं कलाकार व्हावं म्हणून  कित्येक कलाकार मुंबई गाठतात.   छोट्या पडद्यावर   झळकण्याचा त्यांच्या अपेक्षा असतात. मोठ- मोठ्या साहित्य लेखनानंतर ती गोष्ट दाखवा ,ती पटली तर निर्मितीच्या प्रक्रियेला सुरवात करा. अशा लांबलचक प्रक्रियेतून न जाता आपल्याला जे विषय आवडतात ते विषय तरुणांनी  वेबसीरिजच्या माध्यमातून मांडायला सुरवात केलीय. तरुणाईला आकर्षित करण्यासाठी ऑनलाईन  व्यासपीठावर वेबसिरीज हे हॉट आणि हिट माध्यम समजले जाते. चित्रपट , मालिका आपण बघतच असतो. पण मालिकांप्रमाणे सासु सुनेचं कंटाळवाणे रडगाणे हे वेबसिरीज मध्ये नसते. छोट्या आणि नेमक्या मांडणीतून कधी सामाजिक संदेश तर कधी तरुणाईच्या रोजच्या आवडीचे विषय वेबसिरीज मधून पाहायला मिळतात. आजकाल वेबसिरीजचे जाळे ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत सर्वत्र पसरले आहे. सिनेमा आणि मालिका यांचा सुर्वणमध्य असलेल्या वेबसिरीजसाठी आजकाल बड्या कंपन्या प्रचंड पैसे गुंतवत आहे. प्रत्येक कंपन्यांची वेबसिरीज बनवण्याची कारणे वेगळी आहेत.युट्युबवर बऱ्याच वेगवेगळ्या नावाने हिंदी आणि इंग्रजी युट्यूब चॅनल्स आता आपल्या पाहण्यात  येत आहेत.

गेल्या काही वर्षांत वेगवेगळ्या विषयांला अनुसरून येणाऱ्या वेबसिरीज चांगल्या गाजल्या आहेत. १३ भागांची मालिकांनंतर डेलिसोपचा ट्रेंड आला.सिनेमा थिएटर्स मध्ये जाऊन पाहण्याची सवय आता मोडली कारण तिथला सिनेमा आता मोबाईलमध्ये येऊन पोहचला. अँड्रॉइड फोननंतर विविध अॕपच्या साहाय्याने वेबसिरीज पाहण्याचा ट्रेंड वाढला. स्रीविषय,कुमार वयातील मुले -मुली, आत्ताची लाईफस्टाईल, लग्न व्यवस्था, ऑफिसमधील काही समस्या, नाते-संबंध, प्रेमभंग, प्रेमप्रकरण असे अनेक विषय आपल्याला वेबसिरीज मधून पाहायला मिळतात. अशा विषयांना मिळणारा प्रतिसादही तितकाच वाढतोय. विविध प्रकारचे विषय घेऊन हाताळले जाणारे प्रयोग लोकांना आवडू लागले आहे त्यामुळे मनोरंजनाची परिभाषा बदलली आहे. वेबसिरीज सिनेमा आणि मालिका पेक्षा जास्त जवळच्या वाटू लागतील असा दिवस यायला फार काळ नाही राहिला.त्यामुळे वेबसिरीजचे अच्छे दिन आलेत हे नाकारता येणार नाही. स्मार्टफोनच्या अधिक वापरामुळे तसेच त्यावरील वेगवेगळ्या अॕप्समुळे वेगवेगळ्या वेबसिरिजना चांगला प्रतिसाद मिळत राहिलं त्याचबरोबर येत्या काळात आणखी नव्या संकल्पना येतील आणि रूजतीलही. सध्या आहे तो वेबसिरीजचा काळ. वेबसिरीज मधून चांगला बोध घेतला तर त्या फायद्याचे ठरू शकेल. पण वाईट काहीतरी संदेश तुमच्या पर्यंत पोहचला तर त्या नक्कीच

तोट्याचे ठरेलं. त्यामुळे काय चांगले काय वाईट हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे. युट्यूब वेबसिरीज डिजिटल फ्लॕटफोर्म हे सगळ्या तरुणांसाठी वरदान ठरत आहे.त्यामुळे नव्या संकल्पना रूजेपर्यंत तरी या सिरिजला मरण नाही हे नक्की!

Comments

Popular posts from this blog

मी मराठी भाषा बोलतेय.....!

शब्द नसते तर....

थिएटर मधून बाहेर पडताना मी देखील...