थिएटर मधून बाहेर पडताना मी देखील...

छावा…



छावा चित्रपटाचा जेव्हा ट्रेलर प्रदर्शित झाला तेव्हापासूनच छावा चित्रपट Controversy च्या भोवऱ्यात अडकला होता. सध्या Controversy ही एक फॅशनं झालीय. असो आपल्याला Controversy बद्दल काही जास्त बोलायचं नाहीय. 

Controversay ला बळी पडून कोणत्याही चित्रपटाला नाव ठेवण्यापेक्षा एखादा चित्रपट स्वतः चित्रपटगृहात जाऊन पाहणे आणि त्या चित्रपटाचा स्वतः अनुभव घेणे जास्त महत्वाचं वाटत मला... 

 हा माझा अनुभव आणि माझं मत इकडे मांडण्याचा छोटासा प्रयत्न केलाय.. आता पर्यंत बरेच ऐताहसिक चित्रपट आपण पाहत आलोय. पण जेव्हा छावा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला तेव्हा तो चित्रपटगृहातच जाऊन बघण्यासाठी मी उत्सुक होते.. 

छावा चित्रपट बघताना छत्रपती संभाजी महाराजच आपल्यासमोर आहेत यावर विश्वास बसावा इतपत अभिनेता विकी कौशलने ही भूमिका जगली आहे. तसेच अभिनेत्री रश्मिका मंदन्ना ने देखील अगदी उत्तमरीत्या महाराणी येसुबाईची भूमिका साकारली आहे. 

 बुरहान मध्ये छत्रपती संभाजी महाराजांची होणारी एंट्री पाहताना तसेच राज्याभिषेक सोहळ्याच्यावेळी आपल्या आबासाहेबांना आठवून सिंहासनावर बसतानाचा सिन  बघताना आपण आपल्या  राजांच्या स्वराज्यात जन्मलो याचा अभिमान वाटतो. ज्या ज्या वेळी ‘हर हर महादेव’ची गर्जना होते तेव्हा तेव्हा आपल्यात एक ऊर्जा निर्माण होते आणि आपसूकच आपल्याही तोंडातून सुद्धा हर हर महादेव निघतच. 

अभिनेता अक्षय खन्ना देखील औरंगजेबाची भूमिका साकारताना कुठेच कमी पडला नाहीय. धार -धार नजरेचा औरंगजेब त्याने हुबेहूब साकारला आहे. तसेच इतर कलाकारांनी देखील त्यांच्या त्यांच्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे.  "छावा" चित्रपट पाहताना एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे हिंदवी स्वराज्यबद्दल प्रेम, निष्ठा दाखवताना मुस्लिमांविषयीचा द्वेष पसरवण्याची साखळी थोडीफार खंडित केलेली दिसत आहे. ‘स्वराज्याची लढाई कोणत्याही धर्मविरुद्ध नाही’ हे वाक्य छत्रपती संभाजी महाराज्यांच्या तोंडून ऐकताना खूप भारी वाटलं, पण त्या काळात मुघलांनी मराठ्यांवर केलेला अत्याचार,आणि मराठ्यांचा केलेला छळ पाहून काळजाच पाणी पाणी होत. 

छत्रपती संभाजी महाराजांची स्वराज्य जिंकण्याची लढाई पाहताना  तसेच स्वराज्य जिंकण्याच्या लढाईत आपल्याच मराठ्यांची,कटकारस्थाने पाहताना  आपल्या मनात पण एक चीड निर्माण होते . असे गद्दार नसते तर कदाचित आपले राजे कधीच त्या औरंगजेबाच्या तावडीत सापडले नसते. 

छावा चित्रपटाविषयी खूप जणांनी लिहिलं आहे. म्हणूनच छावा चित्रपटाविषयी बोलू तेवढ कमीच आहे. कारण शेवटी संभाजी महाराजांचे हाल बघून, त्यांच्या यातना बघून आणि आपल्या आउसाहेबांना शेवटची मारलेली हाक ऐकून आपण स्वतःचे अश्रू थांबवूच शकणार नाही. 

आपल्या राजाने त्या नराधमाच्या कैदेत ४० दिवस काढले हो… माझ्या राजाने ४० दिवस अत्याचार कसा सहन केला असेल हया विचाराने थिएटर मधून बाहेर पडताना मी देखील माझ्या डोळ्यातल्या अश्रूंना थांबवू शकले नाही. 

छत्रपती संभाजी महाराजांना जर खरच जवळून अनुभवायचं असेल तर छावा चित्रपट चित्रपटगृहातच जाऊनच  बघा

Comments

  1. खूप छान लिहिलं आहे 💯 हर हर महादेव जय शंभू जय शिवराय 🚩❤️🙇🏼‍♂️

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मी मराठी भाषा बोलतेय.....!

शब्द नसते तर....