मी बेस्ट बस...
आठ दिवस झाले ह्या घरात राहून कंटाळा आलाय..घर कोणत अहो हा डेपो हो माझा... समजल आता मी कोण ते... रोज ईकडे -तिकडे फिरायची, रोज त्या टींग टींग बेलच्या आवाजाची, जोर जोरात वाजणाऱ्या हॉर्नची,छोट्या छोट्या कारणावरून भांडण करणाऱ्यांची भांडण ऐकायची सवय झाली हो...! याच लोकांच्या गर्दीच ओझ झेलणारी मी आठ दिवस झाले एकाच ठिकाणी उभी आहे. सगळ्याची लाईन लाईन ना मी अजून किती दिवस मला अस उभ राहाव लागणार .. आपली मुंबई गर्दीची, कष्टकरांची, कामगांराची उजडल्यापासून मावळेपर्यंत गाणे गाणारी.. झोपडी, चाळ, साध्या वसाहतीत राहणारा कामगार संपवण्याचा विडा आता आपल्यातील काही दलालांनी उचलला आहे. काही वर्षांपूर्वी या सोन्याचा मुंबईत मिलचे भोंगे वाजायचे.त्यामध्ये काम करणारा कामगार हा मराठीच होता. जमाना बदला, परिस्थिती बदलली तस राजकारण बदललं, वाटाघटीचे राजकारण सुरू झालं आणि गिरण्या बंद पडल्या, तो गिरणी कामगार हताश झाला, आंदोलनात उतरू लागला,पडद्या मागे वाटाघाटी सुरू झाल्या अखेर गिरणीमध्ये काम करणारा मराठी माणुस मेला...! हो मी बरोबर बोलतेय.. कोणी मुंबई बाहेर गेल तर कोणी गावचा रस्ता पकडला. आता माझ्य...