Posts

जागतिक रंगभूमी दिन.

Image
२७ मार्च...!  २७ मार्च हा दिवस दरवर्षी जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा करतात. रंगभूमी म्हणजे नाटक आणि नाटक म्हणजे फक्त वेगवेगळी पात्र त्या पात्रातून सादर केलेले नाटक असा समज असतो.  १९६१ मध्ये “युनेस्को” च्या इंटरनॅशनल इस्टिट्यूने या दिवसाची सुरुवात केली. पहिला जागतिक रंगभूमी दिन १९६२ मध्ये झाला.  विष्णूदास भावे यांच्या “सीता स्वयंर” या नाटकाने मराठी रंगभूमीची सुरूवात झाली.  त्यानंतर मराठी रंगभूमीने वेगवेगळी वळणे घेतली.  त्यातील एक महत्वाचे वळण म्हणजे संगीत रंगभूमी. मराठी रंगभूमीवर सादर झालेली संगीत नाटके मराठी रंगभूमीचा एक वेगळाच सुवर्णकाळ होता. नाटक हे मराठी माणसाचे पहिले वेड असे म्हणण्यात काही हरकत नाही. चार मराठी माणसे एकत्र आली तर एखादे नाटक सादर झालेच पाहिजे. पोवाडा, भारूड, कीर्तन, दशावतार खेळ ही मुख्य मनोरंजनाचा भाग झाली. “नाटक” या कला प्रकाराला मराठी रसिक प्रेक्षकांनी भरभक्कम पाठबळ दिले आणि रंगभूमी बहरली.   संगीत नाटकांनी परंपरा मागे पडल्यानंतर सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक, कौटुंबिक, विनोदी, रहस्यमय अशा नाटकांनीही काही काळ गाजविला. नाटक ...

कवितेचा नवा डिजिटल प्रवास

साहित्य क्षेत्रात कविता हा एक महत्त्वाचा विषय आहे.पण या एकविसाव्या शतकात साहित्य क्षेत्राची ओढ कमी होतेय.संगणक,इंटरनेट यांच्या जमान्यात माणसे ग्रंथालयात जाण्याचे ट...

कविता कॅफे

Image
कविता....! काय असते कविता? कविता कशी करतात माहित नाही? नक्की कवितेमध्ये काय मांडायच माहित नाही? पण एखादी कविता वाचताना किंवा ऐकल्यावर एक अनोखा आंनद मिळतो जणू काही ती कविता आपल्यावरच लिहिली आहे अस वाटत... म्हणजे मला तरी असच वाटत.. एखाद्या कवीची कविता वाचल्यावर अरे ही कविता आपण पण करू असा सहज विचार डोक्यात येतो.. कविता म्हणजे आपल्या अंर्तमनात अनेक गोष्टींची,घटनांची व त्यांचा आपण लावलेल्या अर्थाची नोंद असावी. बहुदा कविता तेथूनच जन्माला येत असावी. आपण काय पाहतो? आपण कसे जगतो ? यांचा साधारण परिपाक असावा असे मला वाटते. रात्र आणि कविता याचा घनिष्ट संबंध असावा कारण रात्रीचा एकांतात कविता अजुन छान सुचते अस म्हणतात. कविता जी एकांतात बसून सुचते कविता जी समुद्राच्या किनाऱ्यावर बसून सुचते कविता जी किनार्‍याला मिठी मारणाऱ्या लाटांना बघून सुचते कविता जी हिरव्यागार झाडांना बघून सुचते कविता जी उंच डोंगर रांगांकडे बघून सुचते कविता जी पावसाच्या सरीत भिजताना सुचते कविता जी पांढर्‍या शुभ्र कोसळणार्‍या धबधबाकडे बघून सुचते कविता जी उगवत्या सूर्याला बघून सुचते कविता जी निळ्याशार शांत पाण्याकडे ब...

मी बेस्ट बस...

Image
  आठ दिवस झाले ह्या घरात राहून कंटाळा आलाय..घर कोणत अहो हा डेपो हो माझा... समजल आता मी कोण ते... रोज ईकडे -तिकडे फिरायची, रोज त्या टींग टींग बेलच्या आवाजाची, जोर जोरात वाजणाऱ्या हॉर्नची,छोट्या छोट्या कारणावरून भांडण करणाऱ्यांची भांडण  ऐकायची सवय झाली हो...! याच लोकांच्या गर्दीच ओझ झेलणारी मी आठ दिवस झाले एकाच ठिकाणी उभी आहे. सगळ्याची लाईन लाईन ना मी अजून किती दिवस मला अस उभ राहाव लागणार ..   आपली मुंबई गर्दीची, कष्टकरांची, कामगांराची उजडल्यापासून मावळेपर्यंत गाणे गाणारी.. झोपडी, चाळ, साध्या वसाहतीत राहणारा कामगार संपवण्याचा विडा आता आपल्यातील काही दलालांनी उचलला आहे. काही वर्षांपूर्वी या सोन्याचा मुंबईत मिलचे भोंगे वाजायचे.त्यामध्ये काम करणारा कामगार हा मराठीच होता. जमाना बदला, परिस्थिती बदलली तस राजकारण बदललं, वाटाघटीचे राजकारण सुरू झालं आणि गिरण्या बंद पडल्या, तो गिरणी कामगार हताश झाला, आंदोलनात उतरू लागला,पडद्या मागे वाटाघाटी सुरू झाल्या अखेर गिरणीमध्ये काम करणारा मराठी माणुस मेला...! हो मी बरोबर बोलतेय.. कोणी मुंबई बाहेर गेल तर कोणी गावचा रस्ता पकडला. आता माझ्य...

अतुट नात ते..........

Image
अतूट नात ते, सुंदर प्रेमाच नात ते, कधीही हक्काने ओळख करून देणारे नात ते,, अहो अस नात तरी कोणत असाव भाऊ बहीण ते... भावाच निरागस प्रेम अणि बहिणीची माया हे सर्वाच्या भाग्यदायी नसत . नाजुकशी, फुलसुंदर , भोळी भाबडी, हक्काने अरे दादा हाक मारणारी बहीण ..ही माझी लाडकी बहीण अशी ओळख करून देणारा भाऊ प्रत्येकाचाच नशिबात असतो असे नाही. बहिणीच्या सदैव पाठिशी खंबीरपणे उभा राहणारा, अडचणीत नेहमी सगळ्याच्या आधी मदतीसाठी पुढे असणारा, दुसर्‍या कोणी बहिणीला छेडले तर “माझ्या बहिणीकडे वाकड्या नजरेने बघायच नाही ”अशी धमकी देणारा,,वडीलांच्या नंतर घरासाठी एक पुरुष म्हणून सोबत असणारा.. म्हणजे भाऊ ... म्हणतात ना वडीलानंतर घरातला जबाबदार पुरूष म्हणजे मुलगा... पण आता बहीण आणि भावाच्या नात्यातील वागणूकीबदल बोलायच झाल तर तो त्या त्या कुटूंबाच्या विचार करण्यावर आहे.      आताच्या काळात मुलगा ऩमुलगी असा फरक फारसा दिसून येत नाही पण कुटूंबाच्या विचारांवर मात्र काहीसा फरक दिसून येतो. मुलगा म्हणजे घरचा दिवा किंवा घरचा खरा वारस अशी समज असणाऱ्या कुटुंब...

मी मराठी भाषा बोलतेय.....!

“मी मराठी भाषा बोलतेय!  अवघ्या महाराष्ट्राची मायबोली. देववाणी -संस्कृत भाषा ही माझी महामाय. संस्कृतातून प्राकृत निर्माण झाली आणि प्राकृतातून मी अवतरले. पण हे परिवर्तन काही आजचे नाही. त्याचप्रमाणे ते एका दिवसात झालेले नाही. वर्षानुवर्षे हे परिवर्तन चालू होते. सामान्य जनांच्या बोलीतून मी जन्माला आले... मला फार मोठी परंपरा लाभलेली आहे. माझा भांडार सम्रूद्ध झाले. आज सातशे वर्षेात मला माझ्या सारस्वतांनी खूप घडवले त्यात कधीही खंड पडली नाही. माझ्या शुद्धतेविषयी सांगायचे झाले तर अगदी शिवाजी राजांनीही स्वराज्य स्थापनेनंतर पहिले काम काय केले असतील तर माझे शुद्धीकरण करून माझा शब्दकोश तयार करवून घेतला.. माझे मूळ ज्या गीर्वाण-वाणीत आहे तिचा खजिना तर माझ्यासाठी खुला असतो. १९६० साली माझे स्वतंत्र राज्य झाले.. मी राज्यभाषा झाले.... पण आता आजकाल अनेकदा माझ्या भविष्याबद्दलची चिंता व्यक्त केली जाते.. मराठी भाषेचे भवितव्य काय? कारण मोठ मोठ्या शहरांमध्ये मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडत आहेत. बहुसंख्य महाराष्ट्रीय मंडळी आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतात.. का?? तर इंग्रजी भाषेवर प्रभुत...

शब्द नसते तर....

शब्द  शब्द शब्द... आणि  शब्द..!“ शब्द हे आमुचे धन शब्द हेच आमुचे दैवत ”हेच शब्द आपल्यावर रूसले तर....! सततच्या या व्यवहारात वेगवेगळ्या भाषेतले शब्द कानावर येतात. सगळ्याच शब्दांचा अर्थबोध  होतोच असे नाही. कुणाचे शब्द हे मनावर मोरपीस फिरवल्या सारखे सुखद वाटतात तर कुणाचे शब्द कट्यार काळजात घुसावी असे जिव्हारी लागतात .काही भावना शब्दात साकार होतात.. तर काही भावना शब्दांच्या पलीकडे असतात. शब्द म्हणे हे दुधारी शस्त्र आहे कटू शब्दांनी  अनेकदा इतरांची मने दुखावली देखील जातात. शस्त्रांनी झालेली जखम भरून निघते.पण शब्दांची जखम अनेकदा माणसामाणसात कायमचे वैर निर्माण करते.. काही वेळा असेच वाटे नकोच हे शब्द.. चांगल्या शब्दांनी माणसे जवळ येतात.. पण त्यांच चांगल्या शब्दात आपल्या भावना मांडल्या तर भावना मांडणे पण गुन्हा वाटतो.. ज्या शब्दांचा आधार घेऊन आपले विचार ,आपले म्हणे, आपल्या ईच्छा मांडतो त्यांच शब्दांचा वेगळा अर्थ काढून माणसे दुरावली जातात. शब्द म्हणजे फक्त एखाद्या वर टिका करण्यासाठी वापरण्यात येणारे शस्त्र आहे का..? शब्द ही माणसाची फार मोठी शक्ती  आहे फार मोठी निर्मित...