आठवणीचा कट्टा... 😊

तुमच्या आमच्या सर्वांच्या जवळचा.. अगदी कुठेही गेलो तरी त्या जागेवर आपण नक्की रमलेलो असतो. नकळतपणे अगदी घट्ट नात जुळत..लहानपणापासून वयोवृद्धापर्यंत सगळ्याचा जवळचा असलेला कट्टा.... मग कट्टा कोणत्याही असो कॉलेजचा असो किंवा गल्लीचा कट्टा असो.. कट्टा हा म्हणजे तरूणाईचा जीव की प्राण.. या कट्ट्यावर काय घडत ?काय घडत नाही ? ..जमलेली बिघडलेली गुपित करण्यापासून आर्थिक मंदी, महागाई, थोडक्यात काय अख्या जगाची बसल्या जागी सफर इकडे घडते ती याच कट्ट्यावर.. तास तास कट्ट्यावर रेंगाळणार्यांची संख्या काही कमी नसते. मजा मस्ती चर्चा, राग रुसवे फुगवे, प्रेमळ गप्पा अशा सगळ्या गोष्टी कट्ट्यावर पहायला मिळतात. लेक्चंर बंक केल्यानंतर विद्यार्थी सापडण्याची हमखास जागा म्हणजे कट्टा.. एखाद्या रंगाची गंधाची फूल सजवून ठेवावी तशी मुलांच्या गप्पाची मैफल कट्ट्यावर जमवून बसलेली असतात. कॉलेजातले वेगवेगळे नमुने या कट्ट्यावर हमखास पहायला मिळतातच. रँगिंगवर बंदी असली तरी विद्यार्थांना वेलकम करत त्याची चेष्टामस्करी प्रत्येक कट्ट्यावरच होतेच. मजामस्ती, गप्पाटप्पा, ही कट्ट्यावरची खासियत असली तरी या कट्ट्यावर काही चांगल्या गोष्टी सुद्धा घडून येतात. कोणाला गायनाची आवड असेल तर बाकी कुठे गात नसले तरी कट्ट्यावर मात्र बिनधास्त स्वतःची कला सादर करता येते. त्यातला तरूणाईचा कट्टा म्हणजे say band चा कट्टा ..या say band च्या गँगने तर त्याच्या गायनातून सगळ्यांना वेड लावले. गंमत म्हणून खेळले जाणारे खेळ यातूनही नवा खेळाडू निर्माण होतो. Enjoyment असली तरी या कट्ट्यावर खूप काही शिकायला मिळाते. कट्ट्यावरच्या photo, selfie याला काही प्रमाणच नसते असे म्हणावे लागेल. कॉलेजच्या सुट्टीत हा कट्टा ओस पडतो. हिरवागार नसला तरी त्यावर घालवलेले प्रत्येक सोनेरी क्षण मनाला आनंद देऊन जाणारी असते. अल्बममध्ये कितीतरी फोटोज वेगवेगळे असले तरी कॉलेजचा कट्टा हा कॉमन फोटो असतो. आचार्य अत्रे कट्टा यावर तरूण वर्गासाठी व वयस्कर यांचासाठी  कार्यक्रम राबवले जातात. तर शिवाजी पार्कचा कट्टा हा तरूण मंडळी साठी तारूण्यसुलभ जागा आहे. तर वयस्कर मंडळी साठी संध्याकाळच्या फेरफटक्यानंतर विश्रांतीची जागा आहे. विद्यार्थीमुळे कट्ट्याला मिळणारी सोनेरी छटाही त्या कट्ट्याचा अनुभव सांगून जातो. लहानपणीच्या आठवणी कॉलेजच्या आठवणी मधल्या सर्वात महत्त्वाची आठवण म्हणजे कट्टा....

हर्षाली प्रभाकर सावंत.

#आठवण# #आठवणकट्टा# #काँलेज# #आठवणी# 

Comments

  1. खूप मसित लिहील आहेस हर्षाली.... खरच प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा कट्टा नक्की असतो पण तो आठवणीतच न राहू देता प्रत्यक्षात जगता आला पाहीजे.....

    ReplyDelete
  2. खूप मसित लिहील आहेस हर्षाली.... खरच प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा कट्टा नक्की असतो पण तो आठवणीतच न राहू देता प्रत्यक्षात जगता आला पाहीजे.....

    ReplyDelete
  3. प्रत्येकाच्या आयुष्यतला वयानुसार बदलणार कट्टा 👌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मी मराठी भाषा बोलतेय.....!

शब्द नसते तर....

थिएटर मधून बाहेर पडताना मी देखील...