शब्द नसते तर....
शब्द शब्द शब्द... आणि शब्द..!“ शब्द हे आमुचे धन शब्द हेच आमुचे दैवत ”हेच शब्द आपल्यावर रूसले तर....! सततच्या या व्यवहारात वेगवेगळ्या भाषेतले शब्द कानावर येतात. सगळ्याच शब्दांचा अर्थबोध होतोच असे नाही. कुणाचे शब्द हे मनावर मोरपीस फिरवल्या सारखे सुखद वाटतात तर कुणाचे शब्द कट्यार काळजात घुसावी असे जिव्हारी लागतात .काही भावना शब्दात साकार होतात.. तर काही भावना शब्दांच्या पलीकडे असतात. शब्द म्हणे हे दुधारी शस्त्र आहे कटू शब्दांनी अनेकदा इतरांची मने दुखावली देखील जातात. शस्त्रांनी झालेली जखम भरून निघते.पण शब्दांची जखम अनेकदा माणसामाणसात कायमचे वैर निर्माण करते.. काही वेळा असेच वाटे नकोच हे शब्द.. चांगल्या शब्दांनी माणसे जवळ येतात.. पण त्यांच चांगल्या शब्दात आपल्या भावना मांडल्या तर भावना मांडणे पण गुन्हा वाटतो.. ज्या शब्दांचा आधार घेऊन आपले विचार ,आपले म्हणे, आपल्या ईच्छा मांडतो त्यांच शब्दांचा वेगळा अर्थ काढून माणसे दुरावली जातात. शब्द म्हणजे फक्त एखाद्या वर टिका करण्यासाठी वापरण्यात येणारे शस्त्र आहे का..?
शब्द ही माणसाची फार मोठी शक्ती आहे फार मोठी निर्मिती आहे.. याच एका शस्त्रांने आपण आपल्या मनातले बोलू शकतो माणसाअखेरीज अन्य कोणत्याही प्राण्याकडे ही शक्ती नाही. स्वतःचा मनातले सांगता आलेच नाही तर माणसाची परिस्थिती गुदमरला सारखी झाली असती.रेडिओ, मोबाईल, टिव्ही यावर माणूस कसा बोला असता? किंबहुना रेडिओ, टिव्ही यांचा शोधच लागला नसता.. कविता, पुस्तके,साहित्य...अहो ही लेखनकलाच निर्माण झाली नसती..या शारदा देवीचा दरबार सुना सुना पडेल.. रामायण, महाभारत, बायबल, शेक्सपिअर ,कालिदासासारख्या थोर लोकांचे वाङ़मय निर्माण झाले नसते. पूर्वीचा इतिहास आज आपण वाचू शकतो तो शब्दांमुळेच. माणसाच्या ज्ञानाचे जतन केले, प्रसार केला ते ह्या शब्दांमुळेच. शब्दच नसते तर माणसालाच माणसाचा इतिहास समजला नसता..
शब्द ही अनमोल रत्ने आहेत. आईने गायलेली ओवी,बाबांनी केलेला उपदेश, शिक्षकांनी दिलेली शाबासकी, आणि मित्रांची सदिच्छा हे सर्व शब्दातच व्यक्त करता येते. स्वातंत्र्यलढ्यातील मंतरलेले “वंदे मातरमचे” शब्द किंवा सुभाषबाबुंच्या आझाद हिंद सेनेची “चलो दिल्ली ”ही घोषणा या शब्दांनी कोट्यावधी भारतायांची मने जिंकली. शब्द नुसते ध्वनी नाही तर संस्कृती आहे. शब्द नुसते बोल नाही तर व्यक्त केलेल्या भावना आहेत. माणसाचा आनंद, दु:ख ,त्रास, सहनशक्ती, एकटेपणा, सामर्थ्य आणि मनातल्या अनेक भावना या शब्दातच आहेत.. अशा या शब्दांना माणूस नाहीसे होऊ देईल...
शब्दच हसवतात शब्दच रडवतात
शब्दच शब्दांना निष्फळ ठरवतात !
शब्दच शब्दांना निष्फळ ठरवतात !
शब्दातच प्रेम शब्दाच राग
लहान, मोठा, उच्चनीय शब्दाचाच भाग !
लहान, मोठा, उच्चनीय शब्दाचाच भाग !
शब्दाच बोलकेपण असह्य होऊन जात
ओठांमधल्या शब्दांना मुकेपण येत !
ओठांमधल्या शब्दांना मुकेपण येत !
शब्दांनीच चालतात जगातले व्यवहार
स्वर्ग, मृत्यु हेही शब्दांचाच आधार !
स्वर्ग, मृत्यु हेही शब्दांचाच आधार !
हर्षाली प्रभाकर सावंत
#शब्द# #शब्दव्यक्त# #भावना# #शब्दभावना# #शब्दमहत्व
Well said 🙌🏼👌🏼
ReplyDeleteMast
DeleteWords are important than money💰💰
DeleteNice written it's helpfully for all.😊😊
DeleteThanks
DeleteThanks rutu 😊
ReplyDeleteThanks rutu 😊
ReplyDeleteशब्दांची शक्ति.
ReplyDeleteधन्यवाद सर 😊
DeleteWords everything.
ReplyDeleteधन्यवाद नम्रता 😊😊😃😇
Deleteशब्दांना तलवारीपेक्षा धार असते...... मस्त H@®$HU
ReplyDeleteशब्दातच सर्व काही.. Thanks Akshay 😊😇.
ReplyDeleteKhup Chan lihilay harshali
ReplyDeleteThanks dhiren 😘
Deleteखूप छान मांडल आहेस शब्दांबद्दल शब्दांनी
ReplyDeleteMast 😊
ReplyDeleteMast lihilays harshali शब्दांची ताकद काय आहे हे जाणवून देणार लेखन.... उत्तम...
ReplyDeleteMast lihilays harshali शब्दांची ताकद काय आहे हे जाणवून देणार लेखन.... उत्तम...
ReplyDeleteधन्यवाद Sayali 😊😊😊
ReplyDeleteआम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने । शब्दांचीच शस्त्रे यत्न करू । शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन । शब्द वाटू धन जनलोका । तुका म्हणे पाहा शब्दचि हा देव । शब्देची गौरव पूजा करू
ReplyDeleteवा खूप छान
Great thoughts..n nice arrangment of words..👍
ReplyDeleteEk No "Harshu" ... अति उत्तम लेखन .... 💗
ReplyDeleteJr. Anne Frank .. ❤
ReplyDelete😘😘😘👌
ReplyDeleteWow nice
ReplyDeleteThank you very much rutu
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteThanks 😊 for the essay
ReplyDeleteThis is fantastic and even above that.... just don't have any words to describe it..... .
ReplyDeleteखुप सु़ंदर लिहिलयं तु...मस्त.आणि आयुष्यात सगळ्यांचे शब्द हरवले....नुसते खोटे शब्द आले...खरतर त्यांच पण बरोबर आहे म्हणा...कारण हल्ली खोट्याचं जग आहे नुसतं..सतत चेहऱ्यावर खोटा मुखवटा चढवून ही दुनिया गलिच्छ करायची......मग ते खरे शब्द तरी कसे मिळतील या सोंग घेतलेल्या दुनियेत........ म्हणून शब्द हरवलेचं आहे... खुप सुंदर लिहिला पण हा blog तु..।
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteThanks
ReplyDeleteEast and use full😍😍😘🔥❤
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteVery nice
ReplyDelete