अतुट नात ते..........
अतूट नात ते, सुंदर प्रेमाच नात ते, कधीही हक्काने ओळख करून देणारे नात ते,, अहो अस नात तरी कोणत असाव भाऊ बहीण ते... भावाच निरागस प्रेम अणि बहिणीची माया हे सर्वाच्या भाग्यदायी नसत. नाजुकशी, फुलसुंदर, भोळी भाबडी, हक्काने अरे दादा हाक मारणारी बहीण..ही माझी लाडकी बहीण अशी ओळख करून देणारा भाऊ प्रत्येकाचाच नशिबात असतो असे नाही. बहिणीच्या सदैव पाठिशी खंबीरपणे उभा राहणारा, अडचणीत नेहमी सगळ्याच्या आधी मदतीसाठी पुढे असणारा, दुसर्या कोणी बहिणीला छेडले तर “माझ्या बहिणीकडे वाकड्या नजरेने बघायच नाही ”अशी धमकी देणारा,,वडीलांच्या नंतर घरासाठी एक पुरुष म्हणून सोबत असणारा.. म्हणजे भाऊ... म्हणतात ना वडीलानंतर घरातला जबाबदार पुरूष म्हणजे मुलगा... पण आता बहीण आणि भावाच्या नात्यातील वागणूकीबदल बोलायच झाल तर तो त्या त्या कुटूंबाच्या विचार करण्यावर आहे.
आताच्या काळात मुलगा ऩमुलगी असा फरक फारसा दिसून येत नाही पण कुटूंबाच्या विचारांवर मात्र काहीसा फरक दिसून येतो. मुलगा म्हणजे घरचा दिवा किंवा घरचा खरा वारस अशी समज असणाऱ्या कुटुंबात जर मुलगी जन्माला आली तर तिच दुर्देव म्हणा ना.. अशा कुटूबांत मुलीला दुय्यम स्थान देऊन मुलगा मुलगी भेदभाव केला जातो. भावाच जेवलेल ताट उचल, भावाला उलट उत्तर देऊ नको, तो उशीरा आला तरी चालेल पण तू घरी लवकर ये असे अनेक उपदेश करणारे या कुटुंबात नक्कीच दिसतात. मुलीच्या हातात सतत मोबाईल असण ती सतत मोबाईल वर बोलत असेल तर ती बिघडलेली आहे असे विचारामुळे भावाची उगाचच दादागिरी बहिणीवर असत मग ती बहीण छोटी असो या मोठी पण भाऊ मात्र नेहमीच मोठा..आई वडील्यांचा आधीच भावाचे उपदेश बहीणीला एेकाव लागतात. बहिणीने तरी कशाला एेकाव तिन उलट उत्तर दिल तर काही बिघडणार आहे का? मुलगी घरात सर्वात छोटी असली तर ती घरात सर्वांची लाडकी असेल असा काहींचा समज असतो. बहीण लहान असली तर मोठ्या भावाच एेक.. बहीण मोठी असली तरी छोट्या भावाच एेक.. बहीणीला कमी लेखायचे हे विचार मुलाचा डोक्यात तेव्हाच येतात जेव्हा त्या कुटुंबात मुलगा मुलगी भेद केला जातो.
खरतर अशा विचारसरणी असणाऱ्या कुटूंबाच्या उलट
बघितल तर काही घरात मुलगा मुलगी म्हणजे नेहमीच आनंद आणि सुख असे विचार असणार्या कुटुंबात नेहमीच दोघांना समान वागणूक दिली जाते. बहीण माझी लहान आहे पण तरी माझी मोठी ताई आहे. काही आवडीने किंवा हट्टाने काही मागायचे असेल तर तर तु माझी लाडकी बहीण ना. असा मस्का मारणारा.. तुझ्यासाठी कधीच काही घेणार नाही बघत बस पण तरी रक्षाबंधनला ड्रेस मधे कळत नसेल तरी लपून ड्रेस घेऊन येणारा..साडीत एवढी काही खास नाही दिसत.. माझी बहीण साडीत किती छान दिसते ना असे दुसऱ्याचा कानात सांगणारा... भाऊच असतो.
पुर्वी स्त्री म्हणजे चूल आणि मूल हेच तिचे कार्यक्षेत्र ठरवून दिलेले होत. चार भिंतींच्या आत अडकवले जात असे. दुबळी, अबला, ही तिची केली जात असे पण काहीच्या प्रयत्नातून स्त्रीयांवरची बंधने कमी झाली. पुरूषांच्या बरोबरीने ती प्रत्येक क्षेत्रात अगदी रणांगणावरही आपली कर्तबगारी गाजवत आहे स्त्री आता गुलाम राहिली नाही.म्हणूनच जर विचार बदलले तर भाऊ बहीण मधील वागणूक बदलायला वेळ लागणार नाही..
हर्षाली प्रभाकर सावंत.
अस हे भाऊ बहिणीच नात
क्षणात हसणार , क्षणात रडणार
क्षणात मारणार , क्षणात मार खाणार
क्षणात भांडणार , क्षणात रागवणार
पण किती गहर प्रेम असत हे दोघाच
अस असत हे बहिण भावाच अतूट नात ....
छान
ReplyDeleteछान
ReplyDelete😘👌ho na sundar aahe
ReplyDelete