मी बेस्ट बस...


  आठ दिवस झाले ह्या घरात राहून कंटाळा आलाय..घर
कोणत अहो हा डेपो हो माझा... समजल आता मी कोण ते...
रोज ईकडे -तिकडे फिरायची, रोज त्या टींग टींग बेलच्या आवाजाची, जोर जोरात वाजणाऱ्या हॉर्नची,छोट्या छोट्या कारणावरून भांडण करणाऱ्यांची भांडण  ऐकायची सवय झाली हो...! याच लोकांच्या गर्दीच ओझ झेलणारी मी आठ दिवस झाले एकाच ठिकाणी उभी आहे. सगळ्याची लाईन लाईन ना मी अजून किती दिवस मला अस उभ राहाव लागणार ..
  आपली मुंबई गर्दीची, कष्टकरांची, कामगांराची उजडल्यापासून मावळेपर्यंत गाणे गाणारी.. झोपडी, चाळ, साध्या वसाहतीत राहणारा कामगार संपवण्याचा विडा आता आपल्यातील काही दलालांनी उचलला आहे. काही वर्षांपूर्वी या सोन्याचा मुंबईत मिलचे भोंगे वाजायचे.त्यामध्ये काम करणारा कामगार हा मराठीच होता. जमाना बदला, परिस्थिती बदलली तस राजकारण बदललं, वाटाघटीचे राजकारण सुरू झालं आणि गिरण्या बंद पडल्या, तो गिरणी कामगार हताश झाला, आंदोलनात उतरू लागला,पडद्या मागे वाटाघाटी सुरू झाल्या अखेर गिरणीमध्ये काम करणारा मराठी माणुस मेला...! हो मी बरोबर बोलतेय.. कोणी मुंबई बाहेर गेल तर कोणी गावचा रस्ता पकडला.
आता माझ्या बेस्ट कर्मचार्‍यांची अवस्था देखील काही वेगळी झालेली नाही.बेस्ट कामगार म्हणजे काय हो? तुमच्या आमच्या सारखाच गर्दीतला एक चेहरा, 8 तास त्या गर्दीत उभ राहून टिकीट टिकीट ओरडणारा माझा कंडक्टर असो किंवा तापलेल्या या माझ्या पत्र्याच्या गाडीत मला सांभाळणारा ड्रायव्हर असो..हा चेहरा जेव्हा आरशासमोर उभा राहतो तेव्हा त्याला गिरणी कामगार दिसत असेलच हेच माझे हक्काचे कर्मचारी आता रस्त्यावर उतरलेयत. स्वतःच्या नोकरीसाठी, न्यायहक्कासाठी तो टोकाची लढाई लढतोय. माझ्या हक्काच्या लोकांना आज रस्त्यावर बघून मी हा विचार करतेय की, मराठी माणसाच्या नावाने मत मागणाऱ्या राजकीय पक्षांची मला किव वाटतेय “बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुटला पाहिजे, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीर आहोत ” असे फुकटचे सल्ले देणार्‍यांना लाजा वाटल्या पहिजे . मराठी माणसाच्या नावाने मत मागण्याचा अधिकार सर्व राजकीय पक्षांनी गमावला आहे अस मला वाटतय.
  ज्या बेस्टची सत्ता वर्षानुवर्षे हातात असुनही तासंतास बैठका घेऊन काही निघत नाही?? यातच राजकीय पक्षांच अपयश आहे. पावसाच्या पाण्यात साचलेली मुंबई असेल, दिवाळी असेल, किंवा गणपतीचा सण असेल तरीही हा कर्मचारी स्वतःच्या कुटूंबाबरोबर सण साजरा न करता मुंबईच्या सेवेसाठी उभा राहीला पण माझ्या या कामगारवर कौतुकाची कधी थाप पडली नाही. या कामगारांनी कधी कसल्या अपेक्षा केल्या नाही तो तेव्हाही लढला आजही लढतोय किमान आता तरी माझ्या कर्मचार्‍यांना साथ द्या..! त्यांच्या अडचणी आजच्या आणि कालच्या नाही हो गेल्या कित्येक वर्षांपासूनच्या आहेत... का नाही त्यांचा मागण्या सोडवल्या? का त्यांचा सोबत चर्चा केली नाही? आज तो रस्त्यावर उतरलाय ,राजकारण्या बळी हा बेस्ट कामगार पडलाय ..त्याचामागे खंबीरपणे उभे राहण्याची हीच खरी वेळ आहे.
  पुन्हा एकदा आपल अस्तिव टिकवण्यासाठी सामान्य कामगार रस्तावर उतरलाय. आपल्या न्यायहक्कासाठी तो टोकाची लढाई लढतोय. छत्रपतीच्या या मातीत लढाई कशी लढाईची हे माझ्या मराठी माणसाला सांगायची गरज नाही.
  बेस्ट कामगार गिरणी कामगार होताना बघणार नाही. माझा हा मराठी माणुस जगला पाहिजे तरच तुमची ही लालपरी बेस्ट बस वाचेल..
#मराठी#मराठीमाणूस#मराठीकामगार#बेस्टबस#बेस्टकामगार#बेस्टबससंप#

Comments

  1. भारी मांडणी केली

    ReplyDelete
  2. This is true fact but no one wants to understand the truth .I wish your thoughts may open every Marathi person eyes.

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मी मराठी भाषा बोलतेय.....!

शब्द नसते तर....

थिएटर मधून बाहेर पडताना मी देखील...