थिएटर मधून बाहेर पडताना मी देखील...
.jpg)
छावा… छावा चित्रपटाचा जेव्हा ट्रेलर प्रदर्शित झाला तेव्हापासूनच छावा चित्रपट Controversy च्या भोवऱ्यात अडकला होता. सध्या Controversy ही एक फॅशनं झालीय. असो आपल्याला Controversy बद्दल काही जास्त बोलायचं नाहीय. Controversay ला बळी पडून कोणत्याही चित्रपटाला नाव ठेवण्यापेक्षा एखादा चित्रपट स्वतः चित्रपटगृहात जाऊन पाहणे आणि त्या चित्रपटाचा स्वतः अनुभव घेणे जास्त महत्वाचं वाटत मला... हा माझा अनुभव आणि माझं मत इकडे मांडण्याचा छोटासा प्रयत्न केलाय.. आता पर्यंत बरेच ऐताहसिक चित्रपट आपण पाहत आलोय. पण जेव्हा छावा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला तेव्हा तो चित्रपटगृहातच जाऊन बघण्यासाठी मी उत्सुक होते.. छावा चित्रपट बघताना छत्रपती संभाजी महाराजच आपल्यासमोर आहेत यावर विश्वास बसावा इतपत अभिनेता विकी कौशलने ही भूमिका जगली आहे. तसेच अभिनेत्री रश्मिका मंदन्ना ने देखील अगदी उत्तमरीत्या महाराणी येसुबाईची भूमिका साकारली आहे. बुरहान मध्ये छत्रपती संभाजी महाराजांची होणारी एंट्री पाहताना तसेच राज्याभिषेक सोहळ्याच्यावेळी आपल्या आबासाहेबांना आठवून सिंहासनावर बसतानाचा सिन ब...